राज्य रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत हेल्मेट रॅली संपन्न
पुणे, दि. 7: राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्याकरीता पिंपरी चिंचवडचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचे उद्घाटन प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, विशेष अतिथी शरीरसौष्ठव स्पर्धा विजेते पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.
रॅलीचा मार्ग प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, पिंपरी चिंचवड- स्पाईन रोड- गणेश साम्राज्य चौकातून साईनाथ हॉस्पिटल- प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड असा होता. यावेळी उपस्थितांना रस्ता सुरक्षेची शपथ देण्यात आली.
यावेळी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे मालक व प्रशिक्षक, वाहन वितरकांचे प्रतिनिधी, महिलावर्गांनी सहभाग घेतला, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.